Home गडचिरोली भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांचा जन्मदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांचा जन्मदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

46
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी भाजपा लोकसभा समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे संचालक, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष, नगरपरिषद गडचिरोलीचे माजी सभापती प्रमोदजी पिपरे यांच्या जन्मदिवसानिमित्त सकाळी प्रथम सेमनादेवस्थान येथे सहपत्नीक पूजाअर्चा केली व सर्व शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.

लांजेडा येथील निवासी अपंग विद्यालयात जाऊन अपंग विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस केक कापून व शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुनित करण्यात आला. खाऊ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्यानंतर भाजपा व मित्र परिवाराकडून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयातील सभागृहात प्रमोदजी पिपरे यांचा जन्मदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोदजी पिपरे यांच्या जीवनावर मान्यवरांच्या वतीने प्रकाश टाकून गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार तथा आदिवासी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, रमेशजी भुरसे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मधुकर भांडेकर, गजानन येनगंधलवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपाचे डॉ. नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते , मीनाताई कोडापे, मधुकर भांडेकर, भाजपा तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, भाजपा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!