विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या गोंडवाना सैनिकी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा. संदीप कोटांगले, प्रा. गजानन ढोले, ज्येष्ठ शिक्षक भूपेंद्र चौधरी, शहादुल्ला खान आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक, दलित आणि वंचित समुदायांच्या हक्कांसाठी आपले जीवन समर्पित करणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी दलितांचे जीवन सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी भेदभावाविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याची आणि त्यांनी भारतीय समाजात घडवून आणलेल्या बदलांची प्रत्येक व्यक्तीनी स्मरण करायला पाहिजे. महापरिनिर्वाण दिन हा न्याय, समानता आणि निष्पक्षता या त्यांच्या मूल्यांवर विचार करण्याची संधी देतो. त्यांची शिकवण आजही भारताला प्रभावित करते. त्यांच्या कार्यातून आपण सर्वांनी काही शिकायला पाहिजे अश्या शब्दात प्राचार्य संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर वानखेडे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदान, सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणाविषयीचे विचार यांची माहिती दिली. समस्त जनतेला बाबासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या तत्त्वांचा आदर्श ठेवण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे, सादर केले प्राचार्य संग्रामे यांनी सादर केलेल्या ‘मानवा घे अमुची वंदना’ या मार्मिक गीताने वातावरण भावूक झाले. शेवटी विद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत बाबासाहेबांच्या शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या चार प्रमुख मूल्यांचे पालन करण्याची प्रतिजा घेतली. उपस्थितांनी बाबासाहेबांना अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रवींद्र कोरे यांनी केले तर आभार किशोरलाल साठवणे यांनी मानले.







