Home गडचिरोली गोंडवाना सैनिकी विद्यालयात मृदा दिन साजरा

गोंडवाना सैनिकी विद्यालयात मृदा दिन साजरा

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी ‘जागतिक मृदा दिन’ साजरा करण्यात आला. मृदा संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या बगीच्यातील मृदेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना मृदा संवर्धनाचे महत्त्व सांगण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक शिक्षक रविंद्र कोरे यांनी विद्यार्थ्यांना ‘मृदा आणि माती’ यातील मूलभूत फरक समजावून सांगितला. तसेच मृदा संवर्धनाचे महत्त्व, तिची सुपीकता वाढवण्याचे उपाय, रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि सेंद्रिय शेतीचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. जलसंधारणाचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.

प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “माती हे राष्ट्राचे महत्त्वाचे नैसर्गिक साधन आहे, तर मृदा शेतकऱ्याला मिळालेले वरदान आहे. तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

कार्यक्रमाचे संचालन कार्तिक कोंडावार याने तर जयेश मेश्राम याने उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विषयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रशांत मस्कावर आणि रविंद्र कोरे यांनी पुढाकार घेतला. पर्यवेक्षक अजय वानखेडे यांच्यासह प्रा. संदीप कोटांगले, प्रा. गजानन ढोले, भूपेंद्र चौधरी यांची उपस्थिती होती. शेवटी विद्यार्थ्यांनी “माती वाचवा – भविष्य वाचवा” या घोषणांनी वातावरण भारून टाकले.

error: Content is protected !!