विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील भिकरमौशी येथे श्री. संत गाडगेबाबा क्रीडा व कला मंडळ भिकरमौशी (गोपालपुरी) यांच्या सौजन्याने “लावणी व डॉन्स” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 30 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले. वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन भिकरमौशी येथे श्री. संत गाडगेबाबा क्रीडा व कला मंडळ, भिकरमौशी (गोपालपुरी) यांच्या सौजन्याने “लावणी व डॉन्स” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यादवजी लोहबरे, गोपाल मोगरकर, खेमराज भांडेकर, विजय भुरसे, जितेंद्र नैताम, वाल्मिक भांडेकर, सर्वदास भुरसे, गोलु भांडेकर, आर्यन भांडेकर, रितीक चापळे, वैभव भांडेकर, सुमित कोरेटी, राहुल राऊत, बादल मोगरकर, आदित्य पेंदाम, विनोद चापळे, अविनाश चापळे, अविनाश वासेकर, राजेंद्र कुकडकर, भाष्कर चापडे, अरविंद भांडेकर, राजेंद्र लटारे, वसंत जुमनाके, मुखरु नैताम, अविनाश चापडे, भुषण सातपुते, पंकज भुरसे, अक्षय भुरसे, प्रशांत भुरसे, रोशन धोडरे, अभिषेक जुवारे, सुधीर भांडेकर, सचिन जुवारे, विलास वासेकर, पत्रुजी चापडे, मनोज भांडेकर, प्रशांत भांडेकर, मंगेश भांडेकर, सुरज कोठारे, किशोर होळी, चंदु नैताम, अशिवंत वासेकर, गजुभाऊ भांडेकर, गौरवभाऊ भांडेकर आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







