विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासींच्या संविधानिक हक्क व अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (सेंट्रल झोन) घनश्याम मडावी यांनी मांडली आहे.
मार्च 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून त्याची रुपरेषा लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (सेंट्रल झोन) घनश्याम मडावी यांनी 4 डिसेंबर रोजी नागपूर येथील सभेत दिली.
माजी राज्यमंत्री स्व. बाबुराव मडावी जयंती व माजी आदिवासी विकास मंत्री स्व. मधुकरराव पिचड पुण्यतिथीनिमित्त परिषदेच्या विदर्भ विभागातर्फे बिरसा मुंडा सभागृहात विचारमंथन सभा घेण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घनश्याम मडावी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक महासचिव दिनेश शेराम यांनी केले. अकोला जिल्हाध्यक्ष अजाबराव उईके, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, यवतमाळचे नरेश गेडाम, अमरावतीचे विलास वाघमारे, वर्धाचे नामदेवराव मसराम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विठ्ठल गेडाम, नागपूर जिल्हाध्यक्ष राहुल मसराम आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन सुरेंद्र नैताम यांनी केले. सभेला विजय परतेकी, कैलास मडावी, स्वप्निल मसराम, श्याम कोडापे, रोहित वलके, विनय उईके, यशवंत सिडाम, हिरामण कुंभरे, संगीता परतेकी आदी उपस्थित होते.







