Home गडचिरोली काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ दिल्या घरोघरी भेटी 

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ दिल्या घरोघरी भेटी 

59
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. कविताताई पोरेड्डीवार तसेच प्रभाग क्र. 6 चे उमेदवार रमेशजी चौधरी आणि सारिकाताई बोमनवार यांच्या प्रचारार्थ मतदार बंधु भगिनींच्या भेटी घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जि. प. सदस्य लालसू नागोटी, शंकरराव सालोटकर, नंदु वाईलकर, जितेंद्र मुनघाटे, योगेंद्र झंजाळ, जावेद खान सह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!