Home गडचिरोली संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रम उत्साहात

संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रम उत्साहात

66
Oplus_16908288

– माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस नेते हनमंतु मडावी यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापल्ली येथील पुनागुडम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अत्यंत भक्तिभावाने संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कमिटीचे पदाधिकारी, गावकरी आणि युवकांनी मिळून कार्यक्रमाला मोठी शोभा आणली. पहिल्या दिवशी झेंडा कार्यक्रम आणि चादर गावात फिरविण्याची पारंपरिक विधी उत्साहात पार पडली. दुसऱ्या दिवशी संदल-ए-शरीफ नावाचा लंगर/अन्नदान कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, माजी जि. प. अध्यक्ष आणि अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार, काँग्रेस नेते हनमंतु मडावी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास मार्गदर्शन केले आणि सर्व भाविकांचे मनोबल वाढवले.

कार्यक्रमाच्या आयोजनानासाठी अक्रम, रिंकू आकार, चिंटू अक्रम, जावेद पठाण, दिलीप सिदाम, बालाजी अक्रम, विनोद अक्रम, महेश सल्लम, स्वपील सरकोवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे योगदान लाभले.

या कार्यक्रमाला अज्जू पठाण, प्रशांत गोडसेलवार, स्वप्निल मडावी, प्रकाश दुर्गे, नरेश गरम, सचिन पवार, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत व नगरपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!