Home गडचिरोली भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची घेतली बैठक

भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची घेतली बैठक

58
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदिरानगर – स्नेहनगर प्रभाग क्र. 3 मधील बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची बैठक 19 नोव्हेंबर रोजी भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या इंदिरानगर येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आली.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभाग प्रभारी प्रमोद पिपरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभाग क्र. 3 चे भाजपाचे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे व माजी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह नरेश हजारे, गजानन बुरांडे, बूथ प्रमुख, सदस्य व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!