Home गडचिरोली भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी घेतले मा. खा. डॉ....

भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी घेतले मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांचे आशीर्वाद

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्रणोती सागर निंबोरकर यांनी सोमवारी नामांकन दाखल केले. त्यानंतर मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचे आशिर्वाद घेतले.

माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांना आशिर्वाद देत आगामी निवडणुकीत भक्कम विजयासाठी शुभेच्छा देत, तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सागर निंबोरकर, डॉ. भारत खटी व संजय बारापात्रे उपस्थित होते. निंबोरकर यांच्या उमेदवारीमुळे गडचिरोली शहरात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.

error: Content is protected !!