– प्रभाग क्र. १ मध्ये जनतेचा उत्स्फूर्त आशीर्वाद
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : प्रभाग क्रमांक १ मधील संपूर्ण प्रभागातील घराघरात जाऊन भाजपा नेत्या प्रणोतीताई सागर निंबोरकर यांनी केलेल्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक समस्या जाणून घेत नागरिकांशी संवाद साधताना ताईंनी विकासाची ठोस दिशा मांडली. नागरिकांनी त्यांना प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद देत आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपा कडून उमेदवारी मिळावी, अशी एकमुखी मागणी व्यक्त केली.
जनतेच्या मनात कामाचा आणि प्रामाणिकतेचा ठसा उमटवणाऱ्या प्रणोतीताई यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सदैव प्रयत्न केले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांतही आनंदाचे वातावरण असून, “प्राभाग क्रमांक १ ने दाखवलेला विश्वास संपूर्ण नगरासाठी दिशादर्शक ठरेल,” असे मत पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकीत प्रणोतीताई निंबोरकर यांना भाजपा कडून उमेदवारी मिळून, नागरिक त्यांना नगराध्यक्षपदी निवडून देतील, असा ठाम विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी उपस्थित रमेशजी कांबळे, विष्णूजी कांबळे, प्रमोदजी चिलबुले, रवींद्रजी कायरकर, सुरेशजी निंबोरकर, रवींद्रजी निंबोरकर, नरेशजी चिलबुले, राहुल नीलमवार, अभिजित अंडलकर, प्रसाद कवासे, आशिष नैताम, रुपेश नीलमवार, ऋषिकेश बारापात्रे, राहुल राजूरकर, स्वप्नील खांडरे, प्रशांत देशमुख, अक्षय बोधनकर, आकाश बघेल, शिवम बारड, मयूर मुनघाटे, शुभम रोहनकर, ममताताई चिलबुले, भावनाताई निंबोरकर, बेबीबाई कांबळे, छायाबाई कांबळे हे उपस्थित होते.







