Home गडचिरोली विवेकानंदनगर प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे राकेश रत्नावार यांच्यावर जनतेचा विश्वास

विवेकानंदनगर प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे राकेश रत्नावार यांच्यावर जनतेचा विश्वास

197

– रत्नावार यांना जनतेचा भक्कम पाठिंबा

– राकेश रत्नावार यांचा शाहूनगर – विवेकानंदनगर प्रभाग क्र. 5 मध्ये घरोघरी जनसंपर्क सुरू

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राकेश रत्नावार यांनी शाहूनगर – विवेकानंदनगर प्रभाग क्र. 5 मधून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या उमेदवारीला या प्रभागातील जनतेकडून विश्वास दर्शविला आहे.

राकेश रत्नावार यांच्या उमेदवारीला भक्कम पाठिंबा दर्शविला आहे. त्यांची पक्षाबद्दल दाखविलेली निष्ठा आणि या प्रभागातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी त्यांची धडपड बघून त्यांच्या उमेदवारीवर जोरदार चर्चा सुरू आहे. विवेकानंदनगर प्रभाग क्र. 5 मध्ये ते घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. या भेटीदरम्यान शाहूनगर व विवेकानंदनगर वॉर्डातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नम्र व मृदुभाषी स्वभाव आणि सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे कार्यकर्ते अशी राकेश रत्नावार यांची ओळख निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. लोकांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेत, विकासकामांसाठी ठोस आश्वासन देत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आहे. राकेश रत्नावार यांनी या जनसंपर्क मोहिमेदरम्यान सांगितले की, स्वच्छ, सुजलाम–सुफलाम आणि सुरक्षित प्रभाग निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे.”

स्थानिक नागरिकांनी राकेश रत्नावार यांच्या कार्यशैलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना नगरसेवकपदासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. 5 मध्ये मुलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जनतेसमोर त्यांनी व्यक्त केला. राकेश रत्नावार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जनतेतून “आमचा नगरसेवक – राकेश रत्नावार” अशी घोषणा घुमू लागली आहे.

राकेश रत्नावार आमच्या हाकेला नेहमी धावून येतात. काही समस्या व अडचणी सांगितल्यास त्या समस्या सोडविण्यासाठी ते पत्परतेने धावून येतात. त्यामुळे त्यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व तयार होत आहे. जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे राकेश रत्नावार यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 5 मध्ये काँग्रेस पक्षाकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

error: Content is protected !!