विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ७ नोव्हेंबर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विद्यार्थिनी प्रविणा रमेशराव यावले (प्रवीणा योगेश फुसे) यांना आचार्य (पीएचडी) ची पदवी बहाल करण्यात आली. विद्यापीठाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
प्रवीणा रमेशराव यावले या सध्या स्व. सैनुजी पाटील कोवासे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुरखळा (नवेगाव) येथे भौतीकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. प्रवीणाने “SYNTHESIS CHARACTERIZATION OF SOME YTTRIUM BASED PHOSPHOR MATERIALS” या विषयावर संशोधन करून पीएचडी मिळवली आहे. तसेच त्यांचे दरम्यानच्या काळात स्कोपस जनरलमध्ये चार रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
एन. एच. कॉलेज ब्रम्हपुरीचे माजी प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे आणि एस. एस. जे. कॉलेज अर्जुनी मोरगावचे प्राचार्य डॉ. आय. एस. मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन झाले आहे. विद्यापीठाच्या या यशस्वी विद्यार्थिनीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







