– पूसगुडा (ता चामोर्शी) येथे 9 नोव्हेंबरला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जननायक बिरसा मुंडा सामाजिक न्याय महामेळाव्याचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील रेगडी – हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील पूसगडा येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो.) दिल्ली जिल्हा गडचिरोली तालुका शाखा घोटच्या वतीने “जननायक बिरसा मुंडा” सामाजिक न्याय महामेळावाचे आयोजन उद्या रविवार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रेगडी – हळदवाही जि. प. क्षेत्राच्या सर्वांगीण व सर्वसामान्य, गोरगरिब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या समस्या जाणून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने या भागातील सर्वसामान्य गोरगरीब शोषित वंचित आदिवासी बंधू भगिनी यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत तसेच या कार्यक्रमात “सामाजिक न्याय “व” पेसा “कायदा “मानवी हक्क” व “मानवी मूलभूत अधिकार “या विषयावर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. येथे नागरिकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या सर्व समस्यांचा पाठपुरावा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणार आहे. प्रामुख्याने या कार्यक्रमात सर्व आजी, माजी, सरपंच, उपसरपंच, इलाका प्रमुख, पोलीस पाटील, भूमीया, पुजारी प्रतिष्ठित गणमान्य नागरिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय मानव अधिकार संघटणेत नवीन सदस्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाला चामोर्शी तालुका राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पूसगुडा भागातील सर्व नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, रेगडी – हळदवाही जिल्हा परिषद भागातील नागरिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका चामोर्शी शाखा घोटच्या वतीने समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.







