विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे शनिवारी गडचिरोलीत आले असता पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील हेलिपॅडवर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आत्मीय स्वागत केले.
महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी विधानसभेतील सावली येथे शनिवारी भव्य भाजपा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला बावनकुळे यांच्यासोबत आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, चिमूर विधानसभा आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार सुधाकरजी कोहळे, तसेच सावली तालुक्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







