Home गडचिरोली मार्कंडादेव आश्रमशाळेचा अनिल वड्डे विभागीय लांबउडी स्पर्धेत प्रथम

मार्कंडादेव आश्रमशाळेचा अनिल वड्डे विभागीय लांबउडी स्पर्धेत प्रथम

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नागपूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पार पडल्या. या क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कंडादेव येथील अनिल दुलसा वड्डे यांनी १९ वर्षे वयोगटातील लांबउडीत प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विभागीय क्रीडा लांबउडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरासाठी निवड झाल्याबद्दल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार, मार्कंडादेव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रमोद वरगंटीवार, क्रीडा मार्गदर्शक कृपांती बोरसरे, शिक्षक जीवनदास आभारे, भोजराम लंजे, निर्मला हेडो, मुकेश गेडाम, पल्लवी राठोड, शुभांगी हमंद, के. एम. नेहरकर, राकेश आष्टेकर, साधना शेंदरे, अरूण राऊत, आर. डी. ढोणे, शाळेतील शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका व कर्मचाऱ्यांनी अनिल वड्डे या खेळाडूचे कौतुक केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडलेल्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील विभागीय मैदानी लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, रिले स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मार्कडादेव येथील अनिल वड्डे, स्वरा पदा, मयुरी पोटावी, वर्षा लेकामी, पूजा मट्टामी, अक्षरा होडी, रिना लेकामी, खुशी गोटा, दिव्या दुर्वा, राकेश मट्टामी, सुरेश कुजूर, राहुल तिम्मा या १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

error: Content is protected !!