Home गडचिरोली गडचिरोली पोलीस दलाकडून “एक गाव – एक वाचनालय” उपक्रमातर्गत वांगेतुरी येथे सार्वजनिक...

गडचिरोली पोलीस दलाकडून “एक गाव – एक वाचनालय” उपक्रमातर्गत वांगेतुरी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण

51
Oplus_16908288

– वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

– ग्रंथदिंडीत सहभागी होऊन अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व नागरिकांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या विचारात बळ यावे तसेच विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षांविषयीची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून “एक गाव- एक वाचनालय” हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत हेडरी उपविभागात पोस्टे वांगेतुरी अंतर्गत येणाऱ्या वांगेतुरी येथे 73 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
25 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत वांगेतुरी येथे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.

विशेष बाब म्हणजे गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार तसेच वांगेतुरी परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने श्रमदानातून व लोकवर्गणीतून वांगेतुरी येथे सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्यास पोस्टे वांगेतुरी हद्दीतील 500 पेक्षा अधिक संख्येने नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व वरीष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येऊन त्या माध्यमातून विद्यार्थीं व ग्रामस्थांमध्ये पुस्तक व वाचनाप्रती आवड आणि सन्मान निर्माण होण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपारिक वेशभूषा करून व पारंपारिक वाद्य वाजवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. सदर वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, खुर्ची, पुस्तके, पुस्तके ठेवण्याचे कपाट व इतर मुलभुत सुविधांसह सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

या वाचनलयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांना फायदा होऊन स्पर्धा परिक्षांमध्ये विद्याथ्र्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सन-2023 पासून सुरु करण्यात आलेल्या एक गाव एक वाचनालय उपक्रमाच्या माध्यंमातून यापुर्वी स्थापन करण्यात आलेल्या 72 वाचनालयांचा लाभ अतिदुर्गम भागातील 8500 पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना होत असून या माध्यमातून एकूण 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत. गडचिरोली पोलीसांकडून राबविण्यात येणा­या प्रभावी नागरी कृती उपक्रमांमुळे मागील पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्रातून माओवादी संघटनेमध्ये एकही तरुण-तरुणी भरती झालेले नाही.

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ‘सदर वाचनालयाचा नागरीकांनी/विद्यार्थांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा. या वाचनालयातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात यावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या उद्देशाने वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांची सुरक्षा व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादा विरुद्ध लढा देत नसून जिल्ह्रातील नागरिकांच्या सर्वागिण विकासासाठी देखील कटिबद्ध आहे.’

सदर उद्घाटन प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., असिस्टंट कमांडण्ट सिआरपीएफ 191 बटालियन श्री. मनोज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी श्री. योगेश रांजणकर, पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. दिलीप खडतरे, एसआरपीएफ ग्रुप 18, काटोल नागपूरचे पोउपनि. जनार्धन साबळे तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार, शालेय विद्यार्थी व स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असिस्टंट कमांडण्ट सिआरपीएफ 191 बटालियन श्री. मनोज कुमार, पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि. दिलीप खडतरे, पोउपनि. किशोर सदुलवार, पोउपनि. आबा काळे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि चंद्रकांत शेळके व पोस्टे वांगेतुरी, सीआरपीएफ, एसआरपीएफ व जिल्हा पोलीसचे सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!