– तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावरील धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनंता शिवनाथ कुंभारे यांच्या मेडिकल स्टोअरमधून औषधी विक्री व्यवहारात 15 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी 19 ऑक्टोबर रोजी मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या दोघांसह अन्य एक अशा तिघांदाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल उर्फ उमेश मडावी (रा. गडचिरोली), कोमल उंदिरवाडे (रा. साखरा, ता. गडचिरोली), बाळकृष्ण राऊत (रा. आंबेशिवणी, ता. गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. कुंभारे हे सन 2006 पासून धन्वंतरी हॉस्पिटल व त्याच नावाने मेडिकल चालवत आहेत. त्यांच्या आईच्या नावे दवाखान्याच्या खालच्या मजल्यावर मेडिकल सुरू असून फार्मसिस्ट हर्षल मडावी व हेल्पर कोमल उंदिरवाडे हे अनुक्रमे 2015 व 2016 पासून कामावर होते. दरम्यान औषधी विक्री व्यवहारात व बिलात तफावत आढळून आल्याने त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे चौकशी केली असता 15 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब पुढे आली. यावरून तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







