– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जिल्हाभरात मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी येत्या 27 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या मेळाव्याला काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ गटनेते व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव. किरसान, आमदार रामदास मसराम यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार या मेळाव्यातून करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी यावेळी सांगितले आहे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजित कोवासे, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, काँग्रेस शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार, नेताजी गावतुरे, श्रीनिवास ताडपल्लीवार, देवाजी सोनटक्के, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, नागोराव उईके, संतोष भांडेकर, विपुल येलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे आदींची उपस्थिती होती.







