Home गडचिरोली गडचिरोली ते चांभार्डा बससेवेसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाची बसस्थानकावर धडक

गडचिरोली ते चांभार्डा बससेवेसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाची बसस्थानकावर धडक

70
Oplus_16908288

– अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आगार प्रमुखांना निवेदन

– विद्यार्थी व नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी

– बससेवा तातडीने सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांची बससेवेअभावी होणारी गैरसोय लक्षात घेता गडचिरोली ते चांभार्डा बससेवा नियमीतपणे तातडीने सुरू करावी या मागणीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी गडचिरोली येथील बसस्थानकावर धडक दिली. आगारप्रमुखांना निवेदन देऊन बससेवा सुरू करण्याची जोरदार मागणी रेटून धरण्यात आली. बससेवा तातडीने सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अरविंदभाऊ कात्रटवार यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिला.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करून समस्या लक्षात आणून देताना स्पष्ट केले की, मानव विकास मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मागासलेल्या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोफत बससेवा दिली जाते. ही सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे जेणेकरून मुली शिक्षण सोडू नयेत आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे ही बससेवा एसटी महामंडळाच्या वतीने चालते. मुलींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे हा मानव विकास मिशनच्या बससेवा योजनेचा मुख्य हेतू आहे.

Oplus_16908288

गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील चांभार्डा व परिसरातील अनेक विद्यार्थी गडचिरोली शहर व इतरत्र शिक्षण घेतात. तसेच या परिसरातील नागरिकांना शासकीय व विविध खासगी कामासाठी गडचिरोली शहरात यावे लागते. गडचिरोली वरून चांभार्डा बससेवा सुरू केल्यास या भागातील शाळेकरी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी प्रवासाची सोय होईल तसेच खास करून मुलींना बससेवेमुळे सुरक्षा प्रदान होईल आणि या भागातील नागरिकांना प्रवासाची सुलभ सोय होईल.

बससेवेअभावी चांभार्डा परिसरातील विद्यार्थ्यांना अडचनीचा सामना करावा लागत आहे. सदर परिसर जंगलव्याप्त असून या भागात वन्यप्राण्याचा वावर आहे. त्यामुळे विद्यार्थी सायकलने प्रवास करणे धोकादायक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी मानव विकास मिशन बससेवा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. परंतू चांभार्डा व परिसरातील विद्यार्थ्यांना या सेवेपासून वंचीत राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे. सदर बाब लक्षात घेता येत्या आठवडाभरात गडचिरोलीवरून चांभार्डा बससेवा सुरू करावी आणि विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी अन्यथा बसस्थानकासमोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला. आगार प्रमुखांनी तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन शिवसैनिकांना दिले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दिलीप वेलादी, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, गोपाळ मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुटकार, स्वप्नील जुमनाके, राजेंद्र मेश्राम, तन्मय सहारे, मिथुन शेंडे, सुनील माधवार, भूषण गुरुकार, शामराव सोरते, हितेश वाघाडे, आदित्य परसे, भूषण म्याकलवार, ज्ञानेश्वर कोयलवार, शिवम कोमलवार, बबलू काळबांधे, सुनील कोमलवार, अशोक ठाकरे, समीर ठाकरे, रवींद्र ठाकरे, भाऊराव ठाकरे, नितीन ठाकरे, दिनेश ठाकरे, जीवन सयाम, गयाबाई ठाकरे, वैशाली टेकाम, निर्मला टेकाम, भाग्यश्री ठाकरे, वंदना ठाकरे, कुमदेव आवारी, मनोहर कोसमशीले, प्रफुल मेश्राम, राजेंद्र खेडेकार, प्रवीण आवारी, जगदीश खेवले, महेश खेडेकार, हरिदास रामटेके, गुरूदास कोडाप, गुलाब शेरकी, प्रशांत हर्षे, धर्मेंद्र पेंदाम, अमित चौधरी, चंद्रकांत करेते, संदेश सूर्यवंशी, तन्मय झंजाळ, चिमण मंगर, विश्वास मारभते, संदीप चापले, कुणाल धूर्वे, मोरेश्वर वाघरे, दीपक मुनघाटे, गोपाळ ठाकूर, पुरण उंदिरवाडे, गणेश ठाकरे, अजय ठाकरे, राजु मुरतेली, साहिल निकुरे, राहुल मुरतेली, सुमित कारेते, कुणाल कारेते, लक्ष्मण निकुरे, शिवदास वलादे, वसंत करकाडे, विवेक सावसाकडे आदी शिवसैनिक व शेकडो गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

error: Content is protected !!