Home गडचिरोली कंकडालवार दामपत्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध बतकम्मा मंडळाला दिली भेट

कंकडालवार दामपत्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध बतकम्मा मंडळाला दिली भेट

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ‘बतकाम्मा’ तेलंगणा राज्यातील संस्कृतीशी जोडलेल्या बतकम्मा उत्सवाची परंपरा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील महिला जोपासत आहेत. पित्रूमोक्षा अमावास्येला सुरू होणार्‍या या सणाची दसऱ्याच्या आदल्या दिवशी सांगता केली जाते.

हा सण काकतीया साम्राज्याच्या कालावधीपासून तेलंगणात मोठ्या उत्साहात साजरा करतात. बतकम्मा उत्सवादरम्यान बांबूच्या परडीवर विविध प्रकारची फुले ठेवून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला जातो. सजविलेल्या फुलांना बतकम्मा म्हणतात.

अहेरी विधानसभा क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील इंदाराम, मद्दीगुडम, आलापल्ली मुख्य चौक, आलापल्ली वार्ड नंबर 4, रामय्यापेठा, मोदुमडगु, अहेरी रामपूरसह आदी सद्दूला बतकाम्मा उत्सव मंडळाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सोनालीताई अजय कंकडालवार तसेच सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतु मडावी यांनी भेट घेऊन बतकम्मा व शारदा माताचे पूजन केले. त्यावेळी कंकडालवार परिवाराकडून शारदा व दुर्गा, बतक्कमा मंडळाला वर्गणी देण्यात आली. यावेळी मंडळाने कंकडालवार दामपत्याला स्वागत केले. नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी जि. प. सदस्य अजय नैताम, आलापल्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अज्जू पठाण, नगरपंचायत अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रशांत सरकाटे, राकेश अग्गुवार, पुणेश कंदिकूरवार, रज्जाक पठाण, अनिल इस्कापे, शोभण कोंडरावार, रमेश गोगुलवार, नाईनवार, मिस्त्री, नरेंद्र गर्गम, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, प्रवीण कोरेत, अविनाश गेडाम यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, महिला मंडळी, शारदा व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!