Home गडचिरोली सीआरपीएफच्या 192 बटालियनने राबविले स्वच्छता अभियान

सीआरपीएफच्या 192 बटालियनने राबविले स्वच्छता अभियान

59

– सरकारी बसस्थानक व परिसराची केली स्वच्छता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वच्छता ही सेवा अभियान (एक दिवस, एक तास एकत्र) अंतर्गत गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनने सरकारी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली आहे.

सीआरपीएफ 192 बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या नेतृत्वात द्वितीय कमांडंट अधिकारी नरेंद्र कुमार, द्वितीय कमांडंट अधिकारी व्ही. कमलेश, उपकमांडंट अधिकारी संतोष सहगल, उपकमांडंट अधिकारी नीरज अवस्थी यांच्या देखरेखीखाली गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 192 बटालियनचे कर्मचारी, सरकारी बस डेपोच्या व्यवस्थापक पूजा सहारे आणि परिवहन विभागाचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, शाळा व क्रीडा अकादमीची मुले तसेच स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

सरकारी बस डेपो आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि ती जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे, नागरिकांना आपल्या सभोवतालचे स्वच्छ आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी प्रेरित करणे या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. स्वच्छतेच्या भावनेमध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो, जो आपल्यामध्ये सेवाभाव निर्माण करण्यास मदत करतो. स्वच्छ वातावरण निरोगी मानसिकतेला चालना देते, ज्यामुळे एक स्वच्छ व सशक्त राष्ट्र निर्माण होते. म्हणूनच या स्वच्छता मोहिमेचा एक महत्त्वाचा संदेश आहे. तुमच्या सभोवतालच्या परिसराला प्राधान्य देणे आणि त्यांना तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे. याकरिता स्वच्छता मोहीम राबविण्याची नितांत गरज असल्याचे कमांडंट परविंदर सिंग यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!