Home गडचिरोली पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या गुणवंतांचा आ. अभिजित वंजारी यांच्या हस्ते...

पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या गुणवंतांचा आ. अभिजित वंजारी यांच्या हस्ते सत्कार

116

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : सकाळ माध्यम समूह आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या गुणवंतांचा प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रख्यात करिअर समुपदेशक पाणिनी तेलंग यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, सकाळ नागपूर आवृत्तीचे सरव्यवस्थापक बेंजामिन रॉक, जाहिरात व्यवस्थापक सुधीर तापस, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे आदी उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!