– नापिकीच्या भीतीने मृत्युला कवटाळलेल्या सदाराम मडावी यांच्या कुटुंबाला शिवसेना (उबाठा) पक्षाचा आधार
– बळजबरीने कर्ज वसुली करणाऱ्यास शिवसैनिक कोपरापासून ढोबरापर्यंत सोलून काढल्याशिवाय राहणार नाही ; अरविंदभाऊ कात्रटवार यांचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सततच्या नापिकीला कंटाळून आणि कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या सदाराम धर्मा मडावी (वय 67 वर्ष) या शेतकऱ्याने स्वत:च्याच शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. घरचा कर्ता पुरुष निघुन गेल्याने कुटुंबाची वाताहात झाली. सदरच्या घटनेची माहिती शिवसैनिकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली. कात्रटवार यानी शिवसैनिकांसह मडावी कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच सेवाभाव जोपासत आर्थिक मदत दिली.
कोरेगाव येथील शेतकरी सदाराम धर्मा मडावी (वय 67 वर्ष) यांना 4 एकर शेती असून त्यानी पैशाची जमवाजमव आणि खासगी व सहकारी संस्थेकडून कर्ज घेऊन धानाची रोवनी केली. परंतू सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने खासगी व बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेत सापडले होते. शेवटी त्यानी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. मृत्युला कवटाळले शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने अस्वस्थ झालेले अरविंदभाऊ कात्रटवार यानी कोरेगाव येथे शिवसैनिकासह जाऊन सदाराम मडावी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. कुटुंबाला आधार देत सेवाभाव जोपासत आर्थिक मदत देवुन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तुमच्या पाठीशी असून मडावी कुटूंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. परंतु कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी उध्वस्त होतो. त्यामुळे बँकेचे कर्ज तर सोडाच कुटुंबाचा गाड़ा चालविणे कठीण आहे. बँक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकड़े तगादा लावतात. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता, बँकांनी बळजबरिने कर्ज वसुली करू नये. शेतकरी संकटात सापडला आहे, त्यामुळे बँकांनी कर्ज वसूलीसाठी जबरी करू नये. कोणतीही बॅंक कर्जवसुली साथी तगादा लावीत असेल, तर याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयात येवून समस्या मांडावी. जबरीने कर्ज वसुली करणाऱ्यास शिवसैनिक कोपरापासून ढोबरापर्यंत सोलुन काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादी, गुलाब शेरकी, सचिन कोडाप, कुमदेव आवारी, प्रमोद आवारी, गुरूदास कोडाप, दीपक कोसमशीले, सेनापती शेरकी, महेश खेडेकार, प्रवीण आवारी, साहिल कोसमशीले, महेक कोडाप, मोहित कोसरे, लंकेश सयाम, प्रमोद ठाकरे, विनोद खेवले, मोहित लाजूरकर, लीलाधर मुनघाटे, पराग कुमरे, प्रज्वल वट्टी, पुंजीराम लाजूरकर, चेतन चिकराम, साहिल ठाकरे, भक्तदास झरकर, चंद्रभान कुमरे, प्रफुल डोईजड, लोमेश कुमरे, मंगेश पिठाले, शुभम समर्थ, आदिनाथ वाघमारे, पितांबर नैताम, सूरज कलसार, विलास ठाकरे, मुखरू गेडाम, मोरेश्वर वाकडे, राहुल खेवले, प्रफुल पिठाले, सुभाष म्हस्के, मोहन कुकडकार, विनोद चापले, निरंजन लोहंबरे, पद्माकर होळी, तानबाजी दाजगाये, विलास नैताम, वीरेंद्र मोगरकर, भूमेश्वर मोगरकर, राहुल सावरकर, विलास ढोमणे, अमोल भैसारे, सुधाकर धाकडे, हिरा हर्षे, पुरुषोत्तम ढोलणे, आनंदरावं सोरते, मनोहर भैसारे, सुनील मादेशवार, ज्ञानेश्वर उमलवार, हितेश वाघाडे, कालिदास चिठ्ठलवार, जितेंद्र गांधरवार, रोहित कस्तुरे, आदित्य परसे, पुरुषोत्तम कुमरे, विनोद नरुले, प्रफुल गुरुनुले, अमोल मेश्राम, गणेश गेडाम, सुजल मडावी, सुभाष गुरुनुले, अमित हुलके, सचिन सेलोटे, नंदू शेडमाके, कवळूजी धंदरे, विठ्ठल मंदिरकर, मधुकर बावणे, तेजस धंदरे, गिरीश टेकाम, देवेंद्र वलादे, अजय सेलोटे आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.







