Home गडचिरोली मराठी नाट्यगीतामुळेच शास्त्रीय संगीताची निर्मिती : डॉ. शेखर डोंगरे

मराठी नाट्यगीतामुळेच शास्त्रीय संगीताची निर्मिती : डॉ. शेखर डोंगरे

82

– विदर्भस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : झाडीपट्टी रंगभूमी ही मराठी रंगभूमीचा ध्यास असून मराठी रंगभूमीमध्ये मराठी नाट्यगीतामुळेच शास्त्रीय संगीताची निर्मिती झाली, असे मौल्यवान उद्गार प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी नाट्यगीत गायन स्पर्धेच्याप्रसंगी काढले.

गडचिरोली झाडीपट्टी कलावंत संस्था गडचिरोलीच्या वतीने कमल केशव सभागृह येथे 3 सप्टेंबर 2025 रोजी विदर्भस्तरीय नाट्य गीतगायन स्पर्धा आयोजित कारण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी विनोदी कलावंत प्रा. शेखर डोंगरे हे होते. उद्घाटक म्हणून माजी नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार, सामाजिक कार्यकर्ता बाशीद शेख, संगीतकार प्रल्हाद मेश्राम वडसा, वनपाल सुनील पेंदोरकर, अरविंद गेडाम, ज्येष्ठ रंगकर्मी दादा चुधरी, सुनील चडगूलवार, चुडाराम बल्लारपूरे हे होते.

अध्यक्ष पदावरून बोलतांना प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी शास्त्रीय संगीताची गायकी असलेल्या गायकाना त्यांच्या हक्काचा स्टेज मिळवून त्यांच्यातील सुप्तगुण लोकांपर्यंत पोहचविण्याचा या मंडळाच्चा उद्देश चांगला असून झाडीपट्टी मधील नाट्य कलावंत दिसून येत नाही ही न्यूनता आहे. नाट्यगीत हळू हळू लोप पावत असल्याचे दिसून येते त्यामुळे अश्याप्रकारचे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. आणि नाट्यगीता मुळेच शास्त्रीय संगीता ला प्रसिद्धी मिळाली हे विशेष. या स्पर्धेत भाग घेणारे बाल कलावंत पुढे जाऊन निश्चितच प्रगती करतील हा विस्वास मला वाटतो,असे मौलिक विचार व्यक्त केले. सर्वप्रथम नटेश्वराचे पूजन करून उद्घाटन कारण्यात आले.

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी शास्त्रीय संगीताची गायकी असलेल्या गायकाना त्यांच्या हक्काचा स्टेज मिळवून त्यांच्यातील सुप्तगुण लोकांपर्यंत पोहचविण्याचा या मंडळाच्चा उद्देश चांगला असून झाडीपट्टीमधील नाट्य कलावंत दिसून येत नाही ही न्यूनता आहे. नाट्यगीत हळूहळू लोप पावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अश्याप्रकारचे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. नाट्यगीतामुळेच शास्त्रीय संगीताला प्रसिद्धी मिळाली हे विशेष. या स्पर्धेत भाग घेणारे बाल कलावंत पुढे जाऊन निश्चितच प्रगती करतील, हा विस्वास मला वाटतो, असे मौलिक विचार व्यक्त केले.

उद्घाटक म्हणून बोलताना प्रा. राजेश कात्रटवार म्हणाले की, मागील वर्षीपासून कलावंत संस्थेने चालू केलेला उपक्रम स्तुत्य असून नवरात्रीमध्ये एखादा कार्यक्रम करावा, अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. कार्यक्रमामध्ये चडगुलवार, बाशीद शेख यांचीही भाषणे झाली.

उद्घाटक म्हणून बोलताना प्रा. राजेश कात्रटवार म्हणाले की, मागील वर्षीपासून कलावंत संस्थेने चालू केलेला उपक्रम स्तुत्य असून नवरात्रीमध्ये एखादा कार्यक्रम करावा, अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ नाटककार म्हणून सिद्धार्थ गोवर्धन, ज्येष्ठ कलावंत म्हणून वासुकुमार, राजेंद्र जरुडकर आणि महिला ज्येष्ठ कलावंत म्हणून उषा किरण यांचा मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत परीक्षक म्हणून संगीतकार प्रल्हाद मेश्राम संगीतकार, संगीत शिक्षिका वैशाली मडावी, तुलाराम राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली. या स्पर्धत 7 वर्षांपासून ते 71 वर्षांपर्यंतच्या एकूण 29 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार प्रा. अनिल धामोडे तर प्रमुख अतिथी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, सेवानिवृत्त प्राचार्य शेमदेव चापले, प्रवीण मुक्तावरम, गुरुदेव भक्त, बानबले, पुडके होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे यांनी मार्गदर्शन करताना या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कलावंत संस्थेचे मनापासून कौतुक केले. नाट्यगीत स्पर्धेमुळे स्त्रीयांना व मुलांना गायनात प्राधान्य मिळतो. या संस्थेमार्फत त्यांनी समाज प्रबोधनपर जनजागृतीचे कार्यक्रम करत रहावे. त्यासाठी माझे सहकार्य नेहमीच आपल्या सोबत राहील. मनस्वीनीतर्फे देशोन्नती परिवार बहुजन वर्गातील स्त्रियांना सांस्कृतिक कार्यक्रमामधून पुढे आणण्याचे कार्य करीत आहे, असे ते म्हणाले.

मान्यवारांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक संतोष प्रधान आरमोरी, द्वितीय पारितोषिक राजू ठाकूर चिखली, तृतीय पारितोषिक आसावली ठोंबरे गडचिरोली, चतुर्थ पारितोषिक असीम कृपाकर गडचिरोली तर प्रोत्साहनपर तीन बक्षीस वनश्री मेश्राम ब्रम्हपुरी, जिशान शेख, हिरल सोनटक्के गडचिरोली यांना मिळाले. सहभागी सर्व स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले. नाट्यगीत, नाट्यसंगीत व स्पर्धेच्या नियमांची सविस्तर माहिती देऊन संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन व वर्षा गुरनुले यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय, दिलीप मेश्राम तर आभार प्रदर्शन सचिव राज बोभाटे, विवेक मुन यांनी केले.

कार्यक्रमाकरिता कोषाध्यक्ष मारोती लाकडे, भगवान गेडाम, सदाभाऊ उईके, प्रकाश लाडे, अशोक सूत्रपवार, नवीन शेंडे, रुमाजी भुरले, प्रकाश मेश्राम, शाहीर तुळशीराम उंदीरवाडे, वसंत चापले, विवेक मुन, अमित पिपरे, हेमंत कावळे, राज मराठे, संदीप कुरवटकर, निरंजन भरडकर, ओमप्रकाश संग्रामे, वीरेंद्र सोनावणे, गुरुदेव नैताम, अनिल कडुकर, आयशा अली, उषा मुळे, प्रा. गहाणे, टिकाराम सालोटकर, सविता भोयर यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!