Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा गोटूल समिती वार्षिक सभा संपन्न

गडचिरोली जिल्हा गोटूल समिती वार्षिक सभा संपन्न

82

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा गोटूल समितीची वार्षिक सभा 7 सप्टेंबर रोजी जिल्हा जंगल कामगार सोसायटी गडचिरोली येथे उत्साहात पार पडली.

या सभेत मागील सभेचे कार्यवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. तसेच आगामी ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या आदिवासी देवी-देवतांची महापूजा व भव्य मेळाव्याच्या आयोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सभेला माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. डॉ. देवराव होळी, गोटूल समिती अध्यक्ष नंदूजी नरोटे यांच्यासह अनेक समाजप्रेमी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गडचिरोलीच्या सांस्कृतिक व सामाजिक अस्मितेचा केंद्रबिंदू असलेल्या गोटूल परंपरेच्या जतनासाठी व आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण ठरत आहेत. समाजातील एकोपा व विकासासाठी हे एक पाऊल ठरले आहे.

error: Content is protected !!