Home गडचिरोली कमलताई मुनघाटे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

कमलताई मुनघाटे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

85

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दंडकारण्य शिक्षण संस्था संचालित कमलताई मुनघाटे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता लडके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे पर्यवेक्षक विलास खेवले, उच्च माध्यमिक शिक्षक मोहुर्ले, गोंगल मॅडम, माध्यमिक विभागातील श्री. उरकुडे, श्री. रामेलवार, श्री. विगम, मुनघाटे मॅडम, श्री. वाढणकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी संस्कृती जवादे व जान्हवी चलाख यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने आयोजित भाषण स्पर्धेत इयत्ता दहावीतील संस्कृती जवादे व पायल शेंडे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्य, विचार व शिक्षक म्हणून दिलेल्या योगदानाविषयी उत्कृष्ट विचार मांडले. यानंतर विविध शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका स्मिता लडके यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्यासह समाजप्रबोधक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालयातील प्रेरणादायी साहित्य वाचण्याचे आवाहन केले. तसेच जबाबदार व जागरूक नागरिक बनण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी जान्हवी चलाख हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!