– मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांचे मार्गदर्शन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीची जिल्हा पदाधिकारी बैठक आज गडचिरोली येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्यदक्ष जनसंपर्क कार्यालय गडचिरोलीत पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच पुढील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला प्रामुख्याने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले जिल्ह्यातील विधानसभा मंडळ, तालुका मंडळ व जि.प. सर्कल स्तरावर प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी देत पदाधिकाऱ्यांनी सक्रिय कामगिरी बजावून संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
बैठकीस भाजपा जिल्हा अध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, गोंविदजी सारडा, सदानंदजी कुथे, जिल्हा व मंडल पातळीवरील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी काळात भाजपाच्या संघटनात्मक वाढीसाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले.







