Home गडचिरोली नागपूर येथील साखळी उपोषणात गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकाऱ्यांचा सहभाग

नागपूर येथील साखळी उपोषणात गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकाऱ्यांचा सहभाग

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी संविधान चौक नागपूर येथे ३० ऑगस्ट २०२५ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, आमदार डॉ. परिणय फुके, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, प्रकाश साबळे, राहुल तायडे, प्रवीण वानखेडे, अनिल ठाकरे, गुणेश्वर आरीकर, सोनोने, अनिल कंठीवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोलीचे जिल्हा सचिव सुरेश भांडेकर, पुरुषोत्तम मस्के, प्रा. त्र्यंबक करोडकर, वासुदेव कुडे, उमेश आखाडे, पांडुरंग नागापुरे, घनश्याम जकुलवार, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाध्यक्षा मंगला कारेकर, युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार, महेंद्र लटारे, प्रफुल आंबोरकर, संदीप चापले, पंकज खोबे, अंकुश मोगरकर, आरमोरी वरुण चेतन भोयर, मिथुन शेबे, आकाश सोनटक्के यांच्यासह नागपूर, अमरावती, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मान्यवर मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!