Home गडचिरोली आशीर्वादनगरात तान्हा पोळा उत्साहात साजरा

आशीर्वादनगरात तान्हा पोळा उत्साहात साजरा

87
Oplus_16908288

– उत्कृष्ट नंदीबैल व वेशभूषा सजावट स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण

– तान्हा पोळ्यात सहभागी सर्व बालगोपालांना वॉटर बॉटल भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डिंगसमोरील आशीर्वाद नगरात संजय बारापात्रे, रवी मेश्राम, मंगेश रणदिवे व वॉर्ड वासियांच्या वतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या तान्हा पोळा सणात आपापले नंदीबैल सजवून व विविध प्रकाराच्या वेशभूषा धारण करून बालगोपाल व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या तान्हा पोळ्यात उत्कृष्ट नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचे 7001 रुपयांचे बक्षीस भाजपाच्या गडचिरोली जिल्हा महामंत्री व आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस येथील प्रतिष्ठित व्यापारी महेश काबर यांच्या वतीने देण्यात आले. तसेच इतर मान्यवरांकडूनही तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. या तान्हा पोळ्यात सहभागी सर्व बालगोपालांना मिलटान कंपनीचे वॉटर बॉटल भेट स्वरूपात देण्यात आले.

Oplus_16908288

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेवराव किरसान, भाजपाच्या गडचिरोली जिल्हा महामंत्री व आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीताताई हिंगे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, माजी नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार, एकता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अर्जुनवार, गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे, काँग्रेस कार्यकर्ते काशिनाथ भडके आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!