Home गडचिरोली गडचिरोली शहरातील रामनगर, लांझेडा, इंदिरानगर, स्नेहनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

गडचिरोली शहरातील रामनगर, लांझेडा, इंदिरानगर, स्नेहनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील रामनगर, लांझेडा, इंदिरानगर, स्नेहनगर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात व आनंदात भाजपा लोकसभा समन्वयक तथा नगर परिषद माजी सभापती प्रमोद पिपरे व भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

प्रत्येक नगरामध्ये उपस्थित बालगोपाल व पालक यांचा मोठ्या आनंदाने व प्रचंड उत्साहाने तान्हा पोळ्यात आपआपल्या नंदीबैलाची सजावट, वेशभूशेत सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित बालगोपाल व पालकांना प्रमोद पिपरे व योगिता पिपरे यांनी मार्गदर्शनात तान्हा पोळ्याचे महत्व पटवून दिले. यावेळी उपस्थित सर्वाना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रामनगर येथे बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, सुरेश मांडवगडे, संजय मांडवगडे, नामदेव शेंडे, वर्षाताई कन्नाके, अर्चना चन्नावार, रोशनी बानमारे, दर्षिता पिपरे, इंदिरानगर येथे अनुराग पिपरे, पंकज नैताम व बाल गणेश मंडळाचे सदस्य तर लांझेडा येथे विकी नैताम, प्रदीप भांडेकर, तुळाराम नैताम, नरेंद्र भांडेकर व अनेक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व बालगोपाल यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!