Home गडचिरोली स्वातंत्र्यदिनी वसंत विद्यालयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

स्वातंत्र्यदिनी वसंत विद्यालयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

62
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील वसंत विद्यालयात इयत्ता १० वीमध्ये जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल आयुष ब्राम्हणवाडे या विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या १० प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, मुख्याध्यापिका सुचिता कामडी यांची उपस्थिती होती. शिक्षक मधुकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी झेंडा गीत व महाराष्ट्र गीत सादर केले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मीरा बिसेन व प्रवीण दब्बा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर मंदुरकर, मेघश्याम लांजेवार. अनिल पुरी, विद्यानंद चहांदे, संजय वरखडे, तिलोत्तमा सुरपाम, श्रद्धा ठाकरे, उदय धकाते, राजू गेडाम, सचिन धकाते, विभा गावतुरे, राकेश हेडाऊ यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!