Home गडचिरोली गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम

गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम

73

– स्व. वसंतराव नाईक पुण्यतिथी साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सामकी माता विद्या विकास मंडळbगडचिरोलीचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव तथा राज्य परिषद सदस्य गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम व स्व. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम सोमवार,18 ऑगस्ट रोजी स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव, सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव व स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा रेखेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

या निमित्ताने हनुमान मंदिर चामोर्शी, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी व प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव येथे अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी गोवर्धनजी चव्हाण यांच्यासह मुख्याध्यापक जनार्दन चव्हाण, सहायक शिक्षक गुलाब धोती, राजेश मांडोरे, रमेश गोर्लावार, शिक्षक सहारे, वावरे, बोबाटे, श्रीमती राऊत, श्रीमती जिचकार, श्रीमती परशुरामकर, किरण दुधबळे, वासुदेव दुधबावरे, बालाजी राठोड, पियुष मडावी, राजू ठाकरे, राजू वरूडकर, गडपायले, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!