Home गडचिरोली जनतेच्या समस्या तातडीने सोडवा : आ. डॉ. मिलिंदजी नरोटे

जनतेच्या समस्या तातडीने सोडवा : आ. डॉ. मिलिंदजी नरोटे

77
Oplus_16908288

– राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषद अधिकाऱ्यांची घेतली महत्त्वपूर्ण बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जनतेच्या समस्या तातडीने पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आज राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषद अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आमदार डॉ. नरोटे यांनी सविस्तर चर्चा केली. चामोर्शी मार्गावरील वारंवार बंद होणारे पददिवे, रस्ते सुरक्षा व ट्रॅफिक सिग्नल, आरमोरी रोडवरील गटर चेंबर व चौपदरीकरण, कुरूड-शिवनी पूल समोरील रस्त्यावर पडलेले खड्डे, गोविंदपूरजवळ नियोजनाअभावी चुकीचे बांधलेले पूल, राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, नगरपरिषद हद्दीतील गटार सफाई व इलेक्ट्रिकल अशा अनेक विषयांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून दर्जेदार व कायमस्वरूपी कामे करण्याचे स्पष्ट आदेश आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी दिले.

गडचिरोली शहर व परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडली.

error: Content is protected !!