विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शहरातील कारगील चौकातील स्मारक येथे ध्वजारोहण अध्यक्ष उदय धकाते यांच्या हस्ते संपन्न झाला. कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ७९ वा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी श्री गुरुदेव प्राथमिक शाळा, राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी देशाभक्ती गीतावर सुंदर कवायत सादर केले.

याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, भाऊराव कोडापे, प्रकाश धकाते, रुपेश सलामे, तुषार निकुरे, महादेव कांबळे, रामा हजारे, दिलीप भारसागडे, पुरुषोत्तम शेंडे, निलिमा देशमुख, प्रमिला कुंभारे, मुख्याध्यापिका मीरा मडावी, वनिता भांडेकर आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.







