Home गडचिरोली अहेरी प्राणहिता सीआरपीएफ कॅम्पमध्ये पोलिसांना बांधल्या राख्या

अहेरी प्राणहिता सीआरपीएफ कॅम्पमध्ये पोलिसांना बांधल्या राख्या

79
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी प्राणहिता 9BN सीआरपीएफ कॅम्प सी – 60 सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी राखी बांधली. देशाची सुरक्षा करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिण भावाच्या नात्यातील प्रेमाचा, सुरक्षेचा व विश्वासाचा रेशीम धागा बांधून त्यांचे मनोबल वाढविले आणि त्याचा कार्याला सलाम केला.

‘रिअल हिरो’ हे आमचे सैनिक आहेत ही भावना याप्रसंगी प्रत्येकाच्या मनात येऊन गेली आणि सगळ्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस यांनी संपूर्ण देशाच्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपा महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

error: Content is protected !!