Home गडचिरोली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

78

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन करावे. स्थानिक नेतृत्वाला आघाडीबाबत निर्णय घेण्याची पूर्ण मुभा असेल. तेव्हा योग्य तो निर्णय आपल्या सोईनुसार करण्यास हरकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) जेष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केले.

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची गडचिरोली शहरातील चंद्रपूर रोडवरील हॉटेल लॅण्डमार्क येथील हॉलमध्ये पदाधिकारी बैठक नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरीक्षक अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, प्रदेश सरचिटणीस शरद सोनकुसरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश चिटणीस ॲड. संजय ठाकरे, प्रदेश चिटणीस ओम शर्मा, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, प्रदेश युवक सरचिटणीस करण गण्यारपवार, युवक जिल्हाध्यक्ष हिमांशू देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.) वृषभ गोरडवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा आज मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना खताच्या तुटवडयाचा सामना करावा लागत आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग होणार्‍या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा अतोनात नुकसान होतो, मात्र भरपाई मिळाली नाही. शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तसेच बोनस शेतकर्‍यांना मिळाले नाहीत. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था बघायला मिळत असून जिल्हा विकासात सर्वांगीणदृष्ट्या मागे पडत आहे. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे मार्गदर्शन करताना म्हणाले, सहकार क्षेत्रातील ताकत राजकारणातील अतिशय महत्वाचा भाग असून अतुल गण्यारपवार यांच्या रूपाने आपल्या जिल्ह्यात ती ताकत आहे. मी सहकार क्षेत्र चांगल्याप्रकारे जाणतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या ताकदीचा उपयोग करून यश संपादित करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी जिल्ह्यातील संपूर्ण समस्यांची जाणीव करून दिली. शेतकर्‍यांना खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसून, शेतकर्‍यांना त्या सोबतच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच पक्षाला जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात पोहोचवून शरदचंद्र पवार साहेबांचे विचाराचा प्रसार आणि प्रचार करून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की यश संपादन करू. त्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, चामोर्शी कृ. उ. बा. स. उपसभापती परमानंद मल्लिक, कोरची तालुका अध्यक्ष प्रताप गजभिये, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर भेंडारे, तालुका खरेदी विक्री उपाध्यक्ष मुरलीधर बुरे, तालुका खरेदी विक्री संघ चामोर्शीचे माजी अध्यक्ष गुरुदास चुधरी, अहेरी तालुकाध्यक्ष रमेश चुक्कावार, एटापल्ली तालुका अध्यक्ष संतोष समुद्रलवार, आरमोरी सदाशिव भांडेकर, धानोरा तालुकाध्यक्ष बाळू उंदीरवाडे, मधुकर चिंतलवार, चामोर्शी तालुका अध्यक्ष कबीर आभारे, गडचिरोली तालुका अध्यक्ष मनोहर भोयर, वडसा तालुका अध्यक्ष क्षितिज उके, वडसा शहर अध्यक्ष अशोक माडावार, किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष राजन खुणे, चामोर्शी महिला तालुकाध्यक्ष कुंदा जुवारे, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर यांच्यासह जिल्ह्यातील संपूर्ण प्रदेश पदाधिकारी, बाराही तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पक्षाच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे सर्व तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, महिला, युवक, सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!