विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी तालुका धानोरातर्फे 30 जुलै रोजी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा वाढदिवस “सेवा दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करत डॉ. नरोटे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील रुग्णांना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले.

शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाअंतर्गत
जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा, प्रियदर्शनी शाळा धानोरा आणि आकांक्षा विद्यालय धानोरा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनं मिळावीत, हा उद्देश ठेवण्यात आला होता.
तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना भारतीय जनता पार्टी धानोरा तालुकातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सन्मानपूर्वक भेट घेण्यात आली. यावेळी भाजपा
धानोरा तालुक्याच्या वतीने ११,०००/- चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्फतीने शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजपा धानोरा तालुका युवा नेते साजन गुंडावार, सारंग साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







