विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व अतिदुर्गम सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सत्कार केला.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. अमित साळवे, अतिदुर्गम सेलच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत आखाडे, अतिदुर्गम सेल सदस्य डॉ. सचिन हेमके, राज्य प्रतिनिधी सुनील मडावी यांची नियुक्ती झाल्याने शासकीय विश्रामभवन गडचिरोली येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि पेढे भरवून सत्कार केला. वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचे हितसंबंध जोपासून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.







