Home गडचिरोली आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उद्या गडचिरोलीत

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उद्या गडचिरोलीत

67
Oplus_16908288

– रानभाजी महोत्सव, वसतीगृहाचे लोकार्पण, लाभार्थी मेळावा व विभागीय आढाव्याला उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 29 जुलै : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे उद्या, ३० जुलै २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहून आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी, स्थानिक विकासकामांचा आढावा आणि लाभार्थ्यांना योजना वितरण कार्यक्रमात सहभागी होणार असून नागपूर विभागातील आदिवासी विभागाचा आढावा घेणार आहेत.

सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन. 10.30 वा. शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना येथे वृक्षारोपण. 11.00 वा. सुमानंद सभागृह, आरमोरी रोड येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन व विविध आश्रमशाळा व वसतीगृहांच्या इमारतींचे आभासी लोकार्पण. यासोबतच पी.एम. जनमन व धरती आबा योजनांचे लाभार्थी मेळावा व विविध आदिवासी योजनांअंतर्गत लाभ वितरण कार्यक्रम. दुपारी 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 4.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नागपूर विभागीय आढावा बैठकीत आदिवासी विभागाच्या जनजाती न्याय महाअभियान, धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना, वनहक्क दावे व अतिक्रमण संबंधित प्रश्न व आदिवासी महामंडळ योजनांची अंमलबजावणी या प्रमुख योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी सोयीनुसार गडचिरोलीहून यवतमाळकडे प्रयाण करतील.

error: Content is protected !!