Home गडचिरोली भाजपाचे सच्चे संघटनशिल नेतृत्व प्रा. अतुलजी देशकर : डॉ. अशोकजी नेते

भाजपाचे सच्चे संघटनशिल नेतृत्व प्रा. अतुलजी देशकर : डॉ. अशोकजी नेते

103

– माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय नेते, जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ब्रम्हपुरी येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात मोठ्या उत्साहात करण्यात आले.

मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांचा सन्मानपूर्वक सहभाग

या विशेष प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून प्रा. अतुलजी देशकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “अतुल भाऊंना आरोग्यदायी, समृद्ध आणि यशस्वी जीवन लाभो, पुढील वाटचाल अधिक प्रेरणादायी ठरो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

भाजपाच्या संघटनात्मक शक्तीवर मार्गदर्शन
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले की, “भाजपा हा पक्ष नसून कुटुंब आहे. कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच संघटन उभं राहतं आणि पुढे जातं. कार्यकर्ता सजग, सुसंस्कृत, सेवाभावी असावा. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना ही जनतेच्या सेवेचे माध्यम आहेत.”लोकसभेत दिलेल्या सहकार्याने आभार व्यक्त करतो, असे प्रतिपादन मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष हरिश भैया शर्मा यांचे प्रभावी मार्गदर्शन
मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश भैया शर्मा यांनी भाजपा धोरणे, कार्यपद्धती आणि संघटनात्मक कामकाजावर विस्तृत मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.

प्रा. अतुलभाऊ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बोलतांना म्हणाले, कार्यकर्ता हा भाजपाच्या संघटनेचा कणा आहे. मतभेद अनेक असु शकतात. पण मतभेद न करता माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा भाजपाच्या संघटनेवर विशेष भर देत पक्षावर प्रेम करावे, असे बोलत आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी मंचावर वाढदिवसाचे सत्कारमूर्ती माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, माजी जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, विधानसभेचे प्रमुख प्रा. कादरजी शेख, ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रा. प्रकाशजी बगमारे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दिवटे, शहराध्यक्ष सुयोगभाऊ बाळबुद्धे, माजी तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे, माजी शहराध्यक्ष अरविंद नांदुरकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर, सामाजिक नेते देविदास बानबले, कविंद्र रोहनकर, मनोज वठ्ठे, गिरिश चिमुरकर, यशवंत आंबोरकर, लोकनाथ रायपुरे, देवराव चिताडे, लाडे, साकेत भानारकर, स्वप्नील अलगदेवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मनोज भुपाल यांनी तर आभार प्रदर्शन रामलाल दोनाडकर यांनी केले. याप्रसंगी गरजुंना ई-रिक्षाचे वाटप तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्य कौशल्यतेवर विश्वास ठेऊन मा. खा. डॉ. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष हरिश भैया शर्मा, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी भाजपाचा दुपट्टा टाकुण पक्ष प्रवेश केला. ‌‌‌‌‌‌‌वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव कार्यक्रमात भाजपा व घटक संघटनांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रा. अतुलभाऊ देशकर यांना पुष्पगुच्छ देत, हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सेवाभावी नेतृत्वाची प्रशंसा केली.

संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आणि कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्यासाठी नवी ऊर्जा देऊन गेला.

error: Content is protected !!