Home गडचिरोली दर्शन महाराष्ट्राचे – रंग लोककलेचा कार्यक्रमात मा. खा. डॉ. अशोकजी ‌नेते यांची...

दर्शन महाराष्ट्राचे – रंग लोककलेचा कार्यक्रमात मा. खा. डॉ. अशोकजी ‌नेते यांची उपस्थिती

66

– सेवा पंधरवडा” अंतर्गत लोककलेला सलाम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत रविवारी गडचिरोलीतील सुमानंद सभागृहात एक मनोहारी सांस्कृतिक नृत्य महोत्सव “दर्शन महाराष्ट्राचे – रंग लोककलेचा” संपन्न झाला.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेला उजाळा या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातील पारंपरिक नृत्यप्रकार सादर करून लोककलेची एक समृद्ध झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. लोककलेतील विविध रंग, ताल, नृत्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक परंपरेची झलक पाहून उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांचे कार्यक्रमात उपस्थित झाल्याने स्वागत

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, कि.मो. प्र. सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, ज्येष्ठ नेते गजाननराव येंगदलवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार,
यांच्यासह अनेक नागरिक, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक समृद्धतेचा आनंद अनुभवणारा एक अविस्मरणीय कार्यक्रम गडचिरोली सारख्या आदिवासीबहुल भागात असा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोककलेला आणि महाराष्ट्राच्या परंपरेला सन्मान देण्याचे कार्य झाले. या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद. अशाच प्रकारे लोककलेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम होत राहोत हीच अपेक्षा.

error: Content is protected !!