Home गडचिरोली आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी केली इंदिरानगर येथील शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाची...

आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी केली इंदिरानगर येथील शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोलीविधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी 24 जुलै रोजी इंदिरा गांधी नगर परिषद शाळा इंदिरानगर येथे भेट देऊन नवीन इमारतीच्या कामाची पाहणी केली.

विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी ही इमारत उभारण्यात येत आहे. कामाची गुणवत्ता, प्रगती आणि गरजेनुसार आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मुलांसाठी चांगले शिक्षण आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, गणेशजी दहलकर, पवनजी ठाकरे, अंकुशजी पवार व सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!