Home गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरा येथे फळवाटप व वृक्षारोपण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरा येथे फळवाटप व वृक्षारोपण

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आज, 25 जुलै रोजी ग्रामिण रुग्णालय धानोरा येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमात रुग्णांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देण्याचा छोटासा प्रयत्नही करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक जाणीवेचा संदेश देण्यात आला. या माध्यमातून भविष्यासाठी हिरव्या भविष्याची बीजं रोवली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प घेऊन ही मोहिम राबविण्यात आली.

या उपक्रमात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलींदजी नरोटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा धानोरा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सारंगजी साळवे, मिलिंदजी किरंगे, गजाननजी साळवे, सुभाषजी धाईत, सुभाषजी खोबरे, राकेशजी दास, राकेशजी खरवळे, गजानन परचाके, संजयजी कुंडू, अनिलजी म्हशाखेत्री व सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!