– गडचिरोली येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अ.प.) प्रवेश
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आज, 21 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला.
नवीन कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले की, आपला पक्ष हा सर्व धर्म समभाव या विचारसरणीतून तयार झालेला पक्ष आहे. तसेच अजितदादा पवारांसारखे युवा नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यामुळे आपण सर्वांच्या सहकार्यातून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचू, असा आशावाद त्यांनी या वेळेस व्यक्त केला. नवीन कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला अधिक बळकटी प्राप्त होईल. आपल्या कार्यासाठी मी नेहमी तत्पर असेलच, असे प्रतिपादन यावेळेस आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी सिनेट सदस्य व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्याही कार्याची स्तुती केली. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळेस पेटतळा व सुभाष ग्राम येथील ग्रामपंचायत सरपंच सदस्य रमेश कन्नाके, शोभा रमेश कन्नाके, पुष्पाबाई चौधरी, लीलाबाई मेश्राम, परशुराम चौधरी, मधुकर मडावी, पारस कन्नाके, सुभाष मंडल, अंकुश सिडाम, विश्वनाथ नेवारे, मीराबाई सिडाम, प्रफुल गेडाम, राजू सिडाम, नंदाजी कोंडापे, दादाजी आत्राम, रामदास आलाम, धाडूजी सिडाम आदींनी पक्षप्रवेश केला.







