Home गडचिरोली राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची एटापल्ली तालुका महिला आघाडी कार्यकारिणी बैठक आज

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची एटापल्ली तालुका महिला आघाडी कार्यकारिणी बैठक आज

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा गडचिरोलीचे वतीने डॉ. प्रणय खुणे यांच्या सुचनेनुसार विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांच्या अध्यक्षतेत व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एटापल्ली येथील विश्रामगृहात आज, 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता एटापल्ली तालुका महिला आघाडी कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची महिला तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे.

यावेळी महिला संघटना अध्यक्ष, महिला उपाध्यक्ष, महिला सचिव, महिला सहसचिव, महिला कोषध्यक्ष व सदस्य यांची एकमताने निवड करण्यात येणार आहे. तरी सामाजिक कार्य करण्यास इच्छुक महिला भगिनी यांनी आयोजित या बैठकीत मोठया संख्येत उपस्थित रहावे, असे आव्हान राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मनीषा मडावी यांनी केले आहे.

error: Content is protected !!