Home गडचिरोली शिर्डी येथे जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाची अखिल भारतीय बैठक

शिर्डी येथे जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाची अखिल भारतीय बैठक

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाची अखिल भारतीय बैठक शिर्डी येथे नुकतीच पार पडली. या अखिल भारतीय बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय मार्गदर्शक प्रशांतजी हरताळकर, राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषालीताई जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख शुभांगी सुनील मेंढे, जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाच्या उत्तर भारत संयोजिका अनुराधा कृष्णपाल यादव, बैठकीच्या आयोजिका तथा पश्चिम महाराष्ट्र संयोजिका धनश्री सुजयजी विखे पाटील उपस्थित होत्या.

या बैठकीत जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाच्या गडचिरोली जिल्हा संयोजिका तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, गोंदिया जिल्हा संयोजिका सविताताई पुराम, अहेरीच्या माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे उपस्थित होत्या.

जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाच्या अखिल भारतीय बैठकीच्या प्रथम सत्रात जनप्रतिनिधी परिवार व विश्वमांगल्य सभा – संघटन या विषयावर तर दुसऱ्या सत्रात विश्व मांगल्य सभेचे विविध कार्य विभाग तथा तिसऱ्या सत्रात सदाचार सभा या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच चौथ्या सत्रात जनप्रतिनिधी परिवार, समाजाचे प्रेरणास्थान या विषयावर तर पाचव्या सत्रात जनप्रतिनिधी परिवार कसा असायला हवा तथा सहाव्या सत्रात संघटनात्मक रचना व आगामी कार्यक्रम या विषयावर बैठकीत प्रमुख मार्गदर्शक मान्यवरांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यानंतर बैठकीचा समारोप करण्यात आला. बैठकीला अनेक जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!