Home गडचिरोली सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर ‘गडचिरोली भूषण’ पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर ‘गडचिरोली भूषण’ पुरस्काराने सन्मानित

87
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सोमवार, 30 जून 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट रामदास पेठ येथे ‘गडचिरोली भूषण 2025’ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक संतोष ताटीकोंडावार यांना ‘गडचिरोली भूषण सन्मान 2025’ ने सन्मानित करण्यात आले.

या सन्मान सोहळ्याला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री उर्मिला कानेटकर, समाज कल्याण विभाग नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, राजूरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप, भाजप अनुसूची जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लाईकराम भंडारकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

संतोष ताटीकोंडावार यांनी समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित केले असून, त्यांच्या उत्कृष्ठ कार्यामुळे शेकडो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आले आहेत. त्यांची समाजासाठी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची असून, त्यांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार उघड झाले आहेत, ज्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे आणि समाजाच्या हिताचे संरक्षण झाले आहे.

error: Content is protected !!