Home गडचिरोली घोट येथे आज मानवधिकार संघटनेची चामोर्शी तालुका कार्यकारिणी बैठक

घोट येथे आज मानवधिकार संघटनेची चामोर्शी तालुका कार्यकारिणी बैठक

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय मानवधिकार संघटना तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने घोट येथे रविवार, २९ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये तालुक्यातील भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्याचबरोबर अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या दृष्टीने तसेच तालुका कार्यकारणीतील काही पदाची नेमणुक करण्याच्या दृष्टीने महत्वाचे बैठकीचा आयोजन करण्यात आलेले आहे.

या बैठकीला राष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानवधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास बन्सोड, महिला आघाडी तालुकाध्यक्षा विशाखा सिन्हा यांनी केले आहे.

error: Content is protected !!