– मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांचे रविवारी गडचिरोली नगरीत आगमन झाल्याने या आगमनानिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देत मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रमुख डाॅ. नितिनजी कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, कि. मो. प्र. स. रमेशजी भुरसे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, जेष्ठ नेते गजाननजी येनगंदलवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







