Home गडचिरोली जन्मत: अंध असलेला चिंतरवेला येथील राजेशची जीवन जगण्याची धडपड

जन्मत: अंध असलेला चिंतरवेला येथील राजेशची जीवन जगण्याची धडपड

119

– राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने राजेश कुम्मरीला आधार देण्याचा प्रयत्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा जवळील चिंतरवेला येथील रहिवाशी जन्मापासून संपूर्ण अंध असलेला राजेश कुम्मरी यांनी सर्वप्रथम गडचिरोलीची चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी खासदार अशोक नेते यांच्या घरी १५ जून रोजी भेट दिली. यावेळी अशोक नेते यांनी सहृदय मनाने राजेशला आर्थिक मदत केली व तिथून तो सरळ आमदार मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्षात आला व त्या ठिकाणी आपली करून कहाणी सांगू लागला.

यावेळी तेथे उपस्थित भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे भाजपा जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, मधुकर भांडेकर उपस्थित होते. त्यांनी त्याची प्रेमाने चौकशी केली व त्याला उपचाराची गरज आहे काय, काय अडचण आहे? याबद्दल विचारणा केली. परंतु त्याने स्पष्ट सांगितले की, साहेब मी जन्मापासून अंध आहे व मी मुंबईपर्यंत उपचार करून आलो. परंतु आता कोणत्याही उपचार होऊ शकणार नाही. त्यानंतर सर्वांनी राजेशला मदत केली डॉ. प्रणय खुणे यांनी त्यांना नवीन कपडे व पायात चप्पल नसल्याने चप्पल घेऊन दिले व त्याच्या सोबत चर्चा केली.

चर्चादरम्यान असे लक्षात आले की, राजेश खूप हुशार व ज्ञानी आहे पण निश्चितच तो अंध असल्यामुळे त्याच्या जीवनात काळोख पसरलेला आहे. आज राजेशला आधाराची गरज आहे. राजेश आपल्या जीवनामध्ये खूप मोठा व्यक्ती बनू शकला असता. परंतु नशिबाने त्याच्या जीवनात अंधत्व दिले व त्याच्या जीवनात अंधार पसरला आहे. परंतु तो न घाबरता हसी खुशी आपला जीवन जगतो आहे आणि निश्चितच राजेशला आज समाजातील तमाम नागरिकांच्या आधार रुपी मदतीची गरज आहे. ईश्वर त्याच्या जीवनामध्ये नेहमी मंगल करो हीच सदिच्छा!.

आपण समाजातील रंजले गांजले व ज्यांना आधार नाही अशा नागरिकांना व प्रामुख्याने दिव्यांग असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!